You are currently viewing नांदगावात ईद ए मिलादुन्नबी निमित्ताने जलसा मिरवणूक

नांदगावात ईद ए मिलादुन्नबी निमित्ताने जलसा मिरवणूक

कणकवली

नांदगावात ईद ए मिलादुन्नबी निमित्ताने जलसा मिरवणूक काढण्यात आली.नांदगांव तिठा येथे तकरीर करण्यात आली व नांदगांव तिठा व खालची मुस्लिम वाडी मजिद येथे समाप्त करण्यात आली . या वेळेस मुस्लिम बांधव यांनी पैगंबर दिनानिमित्त प्रत्येकानी आपआपल्या घरात मोहल्ल्यात रोशनाई केली. 12 दिवस तकरीर करण्यात आली. या वेळेस मिठाई, शिरखुरमा , लाडू, सरबत समोसे, पेढे आदि मिठाई वाटण्यात आली . या वेळेस ‘नारे तकबीर अलाहो अकबर नारे रिसालत या रसूलूलाह’ अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळेस सर्व मुस्लिम बांधव व हिंदु बांधवही सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा