You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यातील भाजपा च्या शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक संपन्न

वेंगुर्ले तालुक्यातील भाजपा च्या शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक संपन्न

🔸 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे प्रत्येक बुथ वर नियोजन .
🔸नमो अॅप समर्पण ( मायक्रो डोनेशन ) अभियानाचे प्रत्येक शक्ती केंद्रामध्ये नियोजन .
🔸” मन की बात ” अभियानाच्या तालुका संयोजकपदी बाबली वायंगणकर यांची निवड .

भाजपा च्या वेंगुर्ले तालुक्यातील शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली . यावेळी ” मन की बात ” अभियानाचे संयोजक बाबली वायंगणकर , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर मान्यवर म्हणून उपस्थित होते .
यावेळी शक्ती केंद्र निहाय बुथचा आढावा घेण्यात आला .तसेच ३० जानेवारी रोजी होणारया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ” मन की बात ” कार्यक्रम प्रत्येक बुथ वर किमान एक ठिकाणी दाखविण्याचे नियोजन करण्यात आले . तसेच या कार्यक्रमात बुथ सदस्यांबरोबर नागरिकांनाही सामावून घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच राष्ट्रीय कार्यकारणी स्तरावरुन नमो अॅप समर्पण ( मायक्रो डोनेशन ) अभियान सुरु करण्यात आले आहे ,त्या अनुषंगाने प्रत्येक भाजपा पदाधिकारी , कार्यकर्ता तसेच भाजपा हितचिंतक यांनी पार्टी फंड म्हणून किमान ५ रु.ते कमाल १००० रु.मायक्रो डोनेशन च्या रुपाने नमो अॅप च्या माध्यमातून कशा प्रकारे करायचे आहे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले . तसेच प्रत्येक शक्ती केंद्रामध्ये कीमान २५ कार्यकर्त्यांनी समर्पण अभियानात सहभागी करून घेण्यासाठीचे नियोजन करण्यात आले .
यावेळी ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ , प्रभारी ज्ञानेश्वर केळजी , रेडी शक्ती केंद्र प्रमुख जगंन्नाथ राणे , शिरोडा शक्ती केंद्र प्रमुख विद्याधर धानजी , आरवली शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक , आसोली शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर , अणसुर शक्ती केंद्र प्रमुख गणेश गावडे ,उभादांडा शक्ती केंद्र प्रमुख निलेश मांजरेकर , मठ शक्ती केंद्र प्रमुख विजय बोवलेकर , वेतोरे शक्ती केंद्र प्रमुख सुधीर गावडे , परुळे शक्ती केंद्र प्रमुख रुपेश राणे , म्हापण शक्ती केंद्र प्रमुख नाथा मडवळ व आनंद गावडे , शशी करंगुटकर इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 19 =