You are currently viewing कणकवली उपजिल्हा रुग्णालया समोरील ऑटो गॅरेजला आग…

कणकवली उपजिल्हा रुग्णालया समोरील ऑटो गॅरेजला आग…

मध्यरात्री एकच्या सुमारास घटना ; एक लाखाचे नुकसान…

कणकवली

येेथील उपजिल्हा रुग्णालयासमोर नरवडे रोड येथे साबिया गॅरेजला रात्री एक च्या सुमारास भीषण आग लागली. तसेच शेजारील एका हॉटेलचेही आगीत नुकसान झाले. न.प.च्या अग्निशमन बंबाने आग आटोक्यात आणण्यात आली. आगीच्या घटनेत सुमारे एक लाखाचे नुकसान झाले आहे.

घटनास्थळी एका लाईन मधे सुमारे २० ते २५ स्टॉल आहेत. आग नियंत्रणात आल्याने मोठी दुर्घटना टळली. उपजिल्हा रुग्णालयासमोरील साबिया ऑटो गॅरेज मागील बाजूस अज्ञाताने कोणी शेकोटी पेटवली असावी, त्याचीच झळ लागून सदर आग साबिया गॅरेजला लागली असावी असा अंदाज स्थानिकांतून व्यक्त करण्यात आला. या आगीत गॅरेजमधे ज्वलनशील ऑईल, इतर साहित्य जळून खाक झाले. लगतच हॉटेल सदगुरूला देखील या आगीची झळ बसली. मात्र, वेळीच उपस्थित नागरिकांनी त्यातील साहित्य बाहेर काढले. आगीची माहीती मिळाताच कणकवली अग्निशमक दलाचा बंब दाखल झाला. आग विझवण्याच्या मदतकार्यात सुशिल तांबे, वैभव आरोलकर, श्री. फर्नांडीस, ओमकार वाळवे, न. पं. कर्माचरी श्री. जाधव, श्री. मोर्य, गणेश लाड आदींनी सहभाग घेतला. तर पोलीस नाईक पी एस पार्सेकर, मकरंद माने, होमगार्ड आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच सदर आगीत बॅटरी, गॅरेजचे साहित्य, दोन ऑइलचे बॅरल असे आदी साहित्य मिळून लाख रु. चे नुकसान झाल्याचे गॅरेज मालक असलस शेख व शाहरूख शेख, बोर्डवे यांनी सांगितले.

 

 

 

 

 

कणकवलीत गॅरेजलाभीषण आग

कणकवली
कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर नरवडे रोड येथे साबिया गॅरेजलाभीषण आग लागली असून या आगीची झळ बाजुला असलेल्या अन्य एका हॉटेल सदगुरु यालाही बसली. तर घटनास्थळी एका लाईन मधे सुमारे २० ते २५ स्टॉल असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ही घटना आज मध्यरात्री ( ता. २१ ) १ वा. सुमारास घडली आहे. आग लागल्याची माहिती कळताच कणकवली न. पं.च्या अग्नीशामक बंब घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आली

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − nineteen =