You are currently viewing अकल्पित

अकल्पित

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांची मित्राच्या स्मृतिदिन स्मृती जागृत करणारी काव्यांजली काव्यरचना

गंधाळलेल्या वाटा
दवांकुर तुडवीत आला
जीवन जगला
आनंदाने

पावलोपावली होती
बांधलेली तोरणे फुलांची
सुखी जीवनाची
सुरुवात

इष्ट आप्तेष्ट
सारे कुटुंब सोबती
कशाचीच नव्हती
कमी

मित्र मैत्रिणींनी
होता फुललेला मळा
तत्वच मैत्रीचे
पाळलेले

खेळ नशिबाचा
अवेळी बोलावणे आले
कुणा समजले
अकल्पित

दुःखाचा सागर
धारा अश्रूंच्या अखंडित
अकारण दंडीत
आयुष्यच

मिटतील स्मृती
ना कधी विसरतील
भले सरतील
दिवस

©[दिपी]🖊️
दीपक पटेकर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग, ८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा