You are currently viewing बकरी अचानक रस्त्यावर आल्याने मळगाव येथे दोन आयशर ट्रकची एकमेकास धडक बसून अपघात

बकरी अचानक रस्त्यावर आल्याने मळगाव येथे दोन आयशर ट्रकची एकमेकास धडक बसून अपघात

अपघातात एक जखमी : मात्र आयशर ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान

सावंतवाडी

झाराप-पत्रादेवी चौपदरी महामार्गावर मळगाव जोशी मांजरेकर वाडी येथे समोरून येणाऱ्या बकरीच्या कळपाला वाचवण्यासाठी भरधाव डंपरने अचानक ब्रेक केला असता पाठीमागून येणाऱ्या डंपरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात कुडाळ येथील एक जण जखमी झाला.

अपघात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला. अपघात ग्रस्त दोन्ही डंपर हे आकेरी येथील क्रशर वरून खडी घेऊन, गोवा येथे जात होते हे डंपर भरधाव वेगात असतानाच अचानक रस्त्याच्या एका बाजूने बकरी चा कळप समोर येतात डंपरने ब्रेक केला यावेळी मागील डंपरने समोरील डंपर ला जोरदार धडक दिली यात मागील डंपर मधील चालक जखमी झाला.त्याच्या पायाच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली तर डंपरच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अपघातानंतर जखमी चालक आला उपचाराकरिता येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले या अपघाताची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत येथील पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली नव्हती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + nineteen =