You are currently viewing बंद रिसॉर्टमध्ये गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

बंद रिसॉर्टमध्ये गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

मालवण वायरी जाधववाडी येथील घटना

मालवण

वायरी जाधवाडी येथील धीरज संजय भगत या २५ वर्षीय युवकाने बंद असलेल्या रिसॉर्टच्या मागील जिन्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. धीरज हा अविवाहित होता त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
वायरी जाधववाडी येथील धीरज भगत हा तारकर्ली येथील पर्यटन केंद्रात कामाला होता. शांत स्वभाव व स्मितभाषिपणा या स्वभावामुळे तो सर्वांना परिचित होता. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह पांडुरंग मालवणकर यांच्या मालवणकर रिसॉर्टच्या मागील जिन्याला गळफास लावलेल्या स्थितीत वायरी जाधववाडी येथील ग्रामस्थांना निदर्शनास आला. यावेळी याबाबतची माहिती ग्रामस्थांनी मालवण पोलिसांना दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, भाई मांजरेकर, प्रदीप वेंगुर्लेकर, प्रदीप मांजरेकर, दिलीप घारे, बंड्या लुडबे, सरपंच घनश्याम ढोके, नाना नाईक, गणेश कुडाळकर, दादा मायबा, जितू मायबा, मंदार बोडवे, ताराचंद पाटकर, जयंत पाटकर, नितीन गवंडे, वैभव नागवेकर, सुरेश मायनाक यांनी भगत कुटुंबियांचे सांत्वन केले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक एस.एस. ओटवणेकर, उपनिरीक्षक सचिन पाटील, सिद्धेश चिपकर, श्री. पांचाळ यांनी पंचनामा केला. धीरज याच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.

धीरज काही दिवस तणावात

वायरी जाधववाडी येथील धीरज भगत तारकर्ली पर्यटन केंद्रातील कामा बरोबरच वायरी परिसरात कुंपण देखभालीची छोटी मोठी कामेही करायचा. दोन दिवसापूर्वी धीरज मालवणकर रिसॉर्टच्या समोरील रस्त्यावर आपल्या मोबाईलवर तासनतास बोलत असायचा. यावेळी तो तणावात असल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले देखील होते. त्यामुळे धीरज हा कोणत्या कारणासाठी तणावात होता? त्याने या लहान वयात आत्महत्येचे पाऊल का उचलले ? याबाबत पोलीस शोध घेणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे..

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × two =