You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवींचा शिरोडा भाजपकडून सत्कार…

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवींचा शिरोडा भाजपकडून सत्कार…

वेंगुर्ले

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मनिष दळवी यांची निवड झाल्यानंतर सिंधुदूर्ग जिल्हा बँक शिरोडा शाखेला भेट देण्यासाठी पहिल्यांदाच त्यांचे शिरोडा गावामध्ये आगमन झाले. यावेळी भारतीय जनता पार्टी शिरोडा तर्फे शिरोडा गांधीचौक येथे फटाक्याची आतषबाजी करुन पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

त्यानंतर त्यांनी शिरोडा गावाची ग्रामदेवत श्री देवी माऊलीचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतला. यावेळी श्री देवी माऊली देवस्थान कमिटी शिरोडा तर्फे त्यांना पुष्पगुच्छ,श्रीफळ देऊन व शाल घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा बँक शिरोडा शाखेमध्ये त्यांचे आगमन झाले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग अध्यक्ष मनिष दळवी यांचा भारतीय जनता पार्टी शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी व भाजप शिरोडा शहर ज्येष्ठ पदाधिकारी मनोहर होडावडेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन व शाल घालून भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी शिरोडा, रेडी, आरवली, सरपंच मनोज उगवेकर, रेडी सरपंच रामसिंग राणे, तातोबा कुडव, शिरोडा उपसरपंच राहुल गावडे, रेडी जि.प.सदस्य, माजी आरोग्य शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, पंचायत समिती सदस्य मंगेश कामत, सिंधुदुर्ग बँक शिरोडा शाखेचे अधिकारी दत्तात्रय आजगावकर, वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, माजी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष सौ.निकिता परब, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य सौ.समृद्धी धानजी, सौ.प्राची नाईक, सौ.वेदिका शेटये, रेडी, शिरोडा, आरवली, सागरतीर्थ, शक्ती केंद्र प्रमुख, जगन्नाथ राणे, विद्याधर धानजी, महादेव नाईक,विजय बागकर, शिरोडा गावचे माजी सरपंच विजय पडवळ, भाजप शिरोडा शहर पदाधिकारी चंद्रशेखर गोडकर, अनिल गावडे,दादा शेटये,बाळकृष्ण परब, देऊ उर्फ आपा साळगांवकर, अमित गावडे, मयूरेश शिरोडकर,अशोक परब,बाबल गावडे,सुरेश परब,भाजप शिरोडा शहर युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत,तालुका कार्यकारी सदस्य महेश कोनाडकर,भाजप रेडी ग्राम कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर केरकर,उपाध्यक्ष ओंकार कोनाडकर,देंवेद्र मांजरेकर, चसरचिटणीस गजानन बांदेकर,मच्छीमार आघाडी प्रमुख एकनाथ गवंडी, शिरोडा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

मनीष दळवी सारखे युवा व अभ्यासू अध्यक्ष लाभणे ही सहकार क्षेत्रातील विकासाची नांदी आहे. त्यांनी शिरोडा सारख्या बाजारपेठ असलेल्या गावांमध्ये शेतकरी , मच्छिमार तसेच व्यावसायिक व उद्योजक याना चांगल्या योजना द्वारे अल्प व्याजदरात कर्ज पुरवठा करून नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. तसेच नैसर्गिक आपत्ती व कोरोना सारख्या महामारी मुळे हतबल झालेल्या व आर्थिक दुर्बल कुटुंबासाठी शिक्षण व आरोग्यासाठी च्या विशेष योजना राबविण्यात याव्यात अशी मागणी यावेळी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा