You are currently viewing कन्या

कन्या

कन्या

एक गोड परी असावी,
प्रत्येकाच्या घरात..
सुख समाधान हास्य उल्हास,
घेऊन येते ती दारात.

शोभा वाढते घराची,
तिच्या हसण्या खेळण्याने.
हसतं राहतं घर सारं,
घरात तिच्या बागडण्याने.

स्पर्धा असो, परीक्षा असो,
सदैव ती असते पुढे.
आई बापाच्या डोळ्यांत,
आसवही तीच काढे.

असते जोवरी ती घरी,
बरसतात आनंदाच्या सरी.
चिंतते सुख माहेराचं,
गेली जरी आपुल्या सासरी.

भरून येतो उर बापाचा,
टेकता डोकं छातीवरी.
आशिर्वादाचे हात बापाचे,
असतात पोरीच्या डोईवरी.

बालपणीच्या तिच्या आठवणी,
जपती आई-बाप अंतरी.
येता माहेरी लाडकी कन्या,
ओघळती अश्रू गालावरी…

एक गोड परी असावी…
प्रत्येकाच्या घरात…

(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

*जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा..💐💐*

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + ten =