You are currently viewing राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त डिजीटल पोस्टर्स स्पर्धाचे आयोजन

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त डिजीटल पोस्टर्स स्पर्धाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी 

12 वा राष्ट्रीय मतदार दिन दि.25 जनेवारी रोजी ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त डिजीटल पोस्टर्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.जयकृष्ण फड यांनी दिली.

      राष्ट्रीय मतदार दिनाच्या थिम प्रमाणे सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपुर्ण निवडणूका चा मोठ्या प्रमाणात प्रसार व प्रचार व्हावा, तसेच स्थानिक कलावंताच्या कलागुणांना वाव मिळावा.हा या स्पर्धांचा हेतू आहे. राष्ट्रीय मतदार दिन थिम व त्याशी संबंधित संदेशाची डिजीटल पोस्टर्स (साईज 3 बाय 5 मध्ये ) बनवून sindhudurgsveep2022@gmail.com ई-मेल आयडीवर आपले नांव,पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करुन दि. 23 जानेवारी 2022 पर्यंत पाठविण्यात यावे. डिजीटल पोस्टर्स बनवितांना पोस्टर्सच्या माध्यमातून कल्पकतेचे दर्शन तसेच नागरिकांना एक चांगला संदेश मिळेल या दृष्टीने प्रयत्न करावेत.

      सर्व तालुक्यातून प्राप्त झालेल्या डिजीटल पोस्टर्स मधून जिल्ह्यास्तरावरुन विजेत्याची निवड करण्यात येईल. निवड  करण्यात आलेल्या डिजीटल पोस्टर्स  विजेत्याचे नावासह सर्वच तालुक्यातील मोक्याच्या ठिकाणी व सोशल मिडीयावर प्रसिध्दी करण्यात येणार असून विजेत्यास जिल्हाधिकारी याच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात येणार असल्याचे ही श्री.फड यांनी सागितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + sixteen =