प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गची मागणी
सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी ही पगारदार पतसंस्था असून आदरणीय संस्थापक द . सि .सामंत गुरुजीनी शिक्षकांच्या अडचणी व आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर ही पतपेढी सुरु केली आहे .सद्यस्थितीत संस्थेची आर्थिक स्थिती अत्यंत चांगली असून पतपेढी क्लिन कॅशक्रेडिट मुक्त झालेली आहे,असे असतानाही शिक्षक सभासदांना मात्र दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या व्याज दरात कपात करण्यात आलेली नाही .आपली पतपेढी ही कामधेनू आहे.तिची पत जनमाणसात राहावी यासाठी संस्थेच्या विश्वस्त यांच्या कारभारावर विश्वास ठेवून सर्वसामान्य सभासद आहेत व राहणारही आहेत .परंतु इतर सर्व राष्ट्रीयकृत बँकांकडून पगारदार कर्मचाऱ्याना कमी व्याज दराने कर्ज उपलबध करून दिले जाते परंतु अनेक वार्षिक अधिमंडळ सभांमध्ये सातत्याने मागणी करूनही आजपर्यंत जामिनतारण कर्ज व्याजदरात कपात करण्यात आली नाही हे धोरण सर्वसामान्य सभासदांवर अन्याय करणारे आहे तरी संघटनेच्या वतीने खालील मागण्या करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष श्री संतोष पाताडे व सचिव श्री अरुण पवार यांनी केली आहे.
प्राथमिक शिक्षक भारती संघटनेच्या मागण्या पुढीलप्रमाणे
१) जामीनतारण कर्ज व्याज दर आठ टक्के करावा
२)स्पेशल जामिनतारण कर्ज व्याज दर ९ % करावा.
३)नफ्याच्या योग्य प्रमाणात पतपेढी कर्मचारी याना सानुग्रह अनुदान देण्यात यावे.