You are currently viewing इन्सुली घाटीत पुठ्ठ्याची वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअपला अपघात…

इन्सुली घाटीत पुठ्ठ्याची वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअपला अपघात…

बांदा

सावंतवाडी-बांदा मार्गावर इन्सुली घाटीत पुठ्ठ्याची वाहतूक करणारी बोलेरो पिकअप गाडी घसरून रस्त्याच्या कडेला कलांडुन अपघातग्रस्त झाली. अवकाळी पावसामुळे हा अपघात झाला. जेसीबीच्या साहाय्याने गाडी बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा