मोटार वाहन निरिक्षक यांचा सप्टेंबर 2020 चा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा
मोटार वाहन निरिक्षक यांचा माहे सप्टेंबर 2020 चा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

मोटार वाहन निरिक्षक यांचा सप्टेंबर 2020 चा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

मोटार वाहन निरिक्षक यांचा

माहे सप्टेंबर 2020 चा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी :-

सिंधुदुर्ग प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांचा सप्टेंबर 2020 मध्ये तालुकानिहाय दौरा पुढीलप्रमाणे आहे. 3 सप्टेंबर 2020 रोजी सावंतवाडी, 4 सप्टेंबर 2020 रोजी मालवण, 8 सप्टेंबर 2020 रोजी कणकवली, 9 सप्टेंबर 2020 रोजी देवगड, 10 सप्टेंबर 2020 रोजी वेंगुर्ला, 16 सप्टेंबर 2020 रोजी दोडामार्ग, 17 सप्टेंबर 2020 रोजी कुडाळ, 18 सप्टेंबर 2020 रोजी वैभववाडी असा आहे.

या दौऱ्याच्या ठिकाणी शिकाऊ व पक्की अनुज्ञप्ती, वाहनाची अनुज्ञप्ती, सार्वजनिक वाहनांची बिल्ले संबंधी चाचणी सारथी 4.0 वर ऑनलाईन पध्दतीने भरलेले विहित नमुन्यातील अर्ज सकाळी 10.00 ते 1.00 वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील. तरी अर्जदारांनी मास्क, हातमोजे व स्वत:चे सॅनिटाझर घेऊन कार्यालयात यावे. कोविड 19 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करावे.

वरील तारखांना कोणतीही सुट्टी आल्यास सदर ठिकाणचा दौ-या इतर ठिकाणचा दौऱ्या आटोपल्यावर लगेच कामाच्या दुस-या दिवशी होईल. अर्जदारांनी गैरसोय टाळण्यासाठी वेळेत उपस्थित राहून या सेवेचा लाभ घ्यावा. असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा