You are currently viewing नियमबाह्य प्रशिक्षणार्थींमूळे आपण प्रशिक्षणापासून वंचित

नियमबाह्य प्रशिक्षणार्थींमूळे आपण प्रशिक्षणापासून वंचित

मनसे महिला पदाधिकारी स्नेहा मूळीक यांची तक्रार

गटविकास अधिकार्‍यांना निवेदन : उपोषणाचा इशारा

सावंतवाडी

धाकोरे ग्रामपंचायतअंतर्गत महिलांसाठी घेण्यात आलेल्या केक व शिवणकला प्रशिक्षणात एका महिलेसाठी एकाच प्रशिक्षणाची अट असतानाही ग्रामसंघ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा वापर करून दोन्ही प्रशिक्षणाचा लाभ घेतल्याने आपणास प्रशिक्षणाचा लाभ घेता आला नाही. यामुळे शिवणकला प्रशिक्षण पुन्हा लावण्यात यावे, अशी मागणी मनसे महिला विभाग अध्यक्ष स्नेहा मुळीक यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदानाद्वारे केली.

यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार उपशहरअध्यक्ष शुभम सावंत धाकोरे शाखाध्यक्ष निलेश मुळीक स्नेहा मुळीक अभय देसाई आदी उपस्थित होते. अर्जदार स्नेहा मुळीक यांनी निवेदनात असे म्हटले आहे की धाकोरे ग्रामपंचायत अंतर्गत महिलांसाठी दोन दिवस केक प्रशिक्षण व दोन दिवस शिवणकला प्रशिक्षण लावण्यात आले होते सदरच्या प्रशिक्षणामध्ये एक महिला एकाच प्रशिक्षणात भाग घेऊ शकते असे सांगून फॉर्म भरण्यात आले होते.

यात दोन दिवसांचे केक प्रशिक्षण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवणकला प्रशिक्षण घेण्यात आले मात्र या शिवणकला प्रशिक्षणात केक प्रशिक्षणात भाग घेतलेल्या ही ग्रामसंघ पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली मात्र हे नियमबाह्य असल्याचे आपण दाखवून दिल्याने आपल्यावर मनसिक त्रास देऊन गैरवर्तनुक देत प्रशिक्षणास अडथळा निर्माण केला यामुळे आपणास हवा तसा प्रशिक्षणाचा लाभ घेता आला नाही यामुळे आपले अपूर्ण राहिलेले प्रशिक्षण आपणास पुन्हा देण्यात यावे तर त्या पदाचा गैरवापर करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे तर यावर वेळीच निर्णय न घेतल्यास २६ जानेवारी रोजी ग्रामपंचायतीसमोर उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

WhatsAppFacebookTwitterGmailShare

प्रतिक्रिया व्यक्त करा