You are currently viewing शिवजयंती निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

शिवजयंती निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

वेंगुर्ला

बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय येथे प्रतिवर्षाप्रमाणे शिवजयंती निमित्त १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता खुल्या व शालेय गटात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

खुल्या गटासाठी ‘छ.शिवरायांचे जलदुर्ग व आरमार धोरण‘ आणि शालेय गटासाठी ‘छ.संभाजी महाराजांची युद्धनीती‘ असे विषय असून खुल्या गटासाठी ८ ते १० मिनिटे तर शालेय गटासाठी ६ ते ८ मिनिटे असा वेळ ठेवण्यात आला आहे. खुल्या गटातील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे १५००, ११००, ७५० व उत्तेजनार्थ ५०० ची दोन तर शालेय गटासाठी १०००, ७५०, ५०० व उत्तेजनार्थ २५०ची दोन तसेच चषक व सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.

स्पर्धेत भाग घेण्यासाठी संजय पाटील (९८९०६९४७०९) व सुनील आळवे (९४२१६३११४७) यांच्याशी संफ साधावा. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + four =