जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारित ज्येष्ठ लेखक कवी प्रो.डॉ.जी आर उर्फ प्रवीण जोशी यांची लावणी रचना
पडली थंडी पुसाचा महिना
नका घेऊ राजा असआढवेढ
अवंदा संक्रांतीला द्या मला लुगडं
राया नुसतच काय बोलता हो गोड
।। धृ ।।
सण आला ह्यो संक्रातीचा
पौष महीना भारी थंडीचा
कवेत घ्यावं आता सोसना थंड
राया नुसतच काय बोलता गोड l
काळी चंद्रकळा हो जरतारी
शोभेल माझ्या गोऱ्या अंगावरी
नाही कशाची तिला त्या तोड
राया नुसतच काय बोलता गोड l
पुनवेचा उगवला चन्द्र लाजरा
पिळदार पिंड राजा साजरा
सोडवा मंचकी या गुलाबी कोड
राया नुसतच काय बोलता गोड l
थंडी रातची मोगरा फुलला
झाडा वरचा पारवा डुलला
घ्याव बेतान मारा पक्का जोड
राया नुसतच काय बोलता गोड l
प्रो डॉ जी आर प्रविण जोशी
अंकली बेळगाव
कॉपी राईट 14 जानेवारी 22