You are currently viewing बोल अंतरीचे

बोल अंतरीचे

मनातले सारे
बोलूनिया जाती.
भेद हृदयातले,
खोलूनिया देती.

किती अडवावे,
बोल अंतरीचे,
मुखातील शब्द,
निसटती वाचे.

सुख असो दुःख,
डोळे बोलतील.
भाव मूकेपणी,
अश्रू खोलतील.

वेदनांना वाचा,
बोलताची फुटे.
टोचतात मनी,
शब्दांचेच काटे.

ज्यांच्यासाठी जीव,
ओवाळूनी टाकी.
मनी त्यांच्या नसे,
कधी माणुसकी.

जिवलग असे,
मन दुखावती.
बोल अंतरीचे,
कडवट होती.

(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 8 =