You are currently viewing कुडाळ नगरपंचायत प्रभाग ३ मध्ये शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार कु.अश्विनी विठ्ठल पाटील यांची प्रचारात मोठी आघाडी

कुडाळ नगरपंचायत प्रभाग ३ मध्ये शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार कु.अश्विनी विठ्ठल पाटील यांची प्रचारात मोठी आघाडी

कुडाळ :-

कुडाळ नगरपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३- लक्ष्मीवाडी या प्रभागात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार कु.अश्विनी विठ्ठल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हा मतदार संघ माजी नगरसेवक सचिन काळप यांचा असून, शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही उमेदवार कु.अश्विनी पाटील यांनी पुर्ण प्रभागात जावून, मतदार बांधवांच्या भेटी गाठी घेतल्या. यावेळी स्थानिक नागरीक तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर उपस्थित होते.

 

याठिकाणी माजी नगरसेवक सचिन काळप यांनी कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने तसेच शिवसेनेच्या माध्यमातून चांगल्या पैकी विकास केला आहे.तर ते आपल्या मतदार संघात लोकांना वेळोवेळी मदत तसेच केव्हाही दिवसा- रात्री अपरात्री लोकांच्या मदतीला धावून जात असतात. तसेच सामाजिक कार्यातही ते नेहमी सहभाग घेतात. तर या परिसरात सामाजिक कार्यकर्ते अशीही श्री.सचिन काळप यांची ओळख असल्याने हि निवडणुक श्री.काळप यांच्या प्रतिष्ठेची बनली आहे.

तर शिवसेनेचा हा बालेकिल्ला असल्याने शिवसेनेचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, शिवसेनेचे अतुल बंगे, संजय भोगटे, शहर प्रमुख संतोष शिरसाट, तालुका प्रमुख राजन नाईक तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांच्यासह शिवसेनेच्या व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याठिकाणी जबरदस्त रणनीती आखली आहे. कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेची ही महत्त्वाची जागा राखणारचं असाही निश्चय सर्वानी केला आहे.

आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेने प्रभाग क्रमांक ३ लक्ष्मीवाडी या मतदार संघात शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार कु.अश्विनी पाटील यांच्या प्रचारार्थ मोठी रॅली काढून शक्ती प्रदर्शन करीत मतदार बांधवांचे लक्ष वेधले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 1 =