You are currently viewing सण गोडव्याचा

सण गोडव्याचा

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर यांची काव्यरचना

ऋतु शिशीराचा
मास पौषाचा
सण आवडता
गोड संक्रांतीचा…….१)

तिळगुळ देता
गोड नाते जुळे
कणाकणातुनी
प्रेम दरवळे………२)

खेळ पतंगाचा
मोदे बागडती
सान थोर सारी
मस्त ढील देती…….,…३)

हळदी कुंकु चा
आनंद मेळावा
वाण द्यावे घ्यावे
गोडवा वाढावा………..४)

सणात जपते
संस्कृती महत्व
जपा नातीगोती
आनंदाचे सत्व……….५)

सौ. राधिका भांडारकर
पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा