You are currently viewing रेशीमकोष

रेशीमकोष

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी प्रो.डॉ.जी.आर.उर्फ प्रवीण जोशी यांची काव्यरचना

भिजले चांदणे भिजली माती
सागरातील माणिक मोती

जसा फुटावा रेशीमकोष
उसवली धरती घेऊन श्वास
सागर लाटा घेऊन हाती
भिजली नक्षत्रे सजली धरती

नवगतांचे होता स्वागत
रती मदन होते ऐटीत
ती मिलनाची रात होती
थिजला सागर भिजला मोती

स्वर्ग सुखाचे उघडे द्वार
तृषार्थ होऊन अधीर चकोर
झिरपल्या त्या प्रेम वाती
भिजल्या वाती उझळीत पणती

मधूकोषातील मधु मकरंद
आस्वादित आंनद स्वच्छंद
गाभाऱ्यातील कर्पुर आरती
गरजला मेघ भिजली धरती

कैक क्षण हे येती जाती
नवसृजनाच्या नवं पाती
युगांन युगे सरल्या राती
नटले सृजन नटली धरती

सर्व काही उघड गुपित
परंपरेचे होता पाईक
ऋणानुबंध जमता नाती
भिजले चांदणे भिजली माती

प्रो डॉ जी आर (प्रवीण) जोशी
अंकली बेळगाव
कॉपी राईट
भोगी व मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा

प्रतिक्रिया व्यक्त करा