कुडाळ
निवडणुक निकालाच्या दिवशी वाहतुकीस अडथळा निर्णाण होऊ नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बुधवार १९ रोजीचा कुडाळचा आठवडा बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. याची सर्व व्यापारी, विक्रेते तसेच नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नितीन गाढवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. कुडाळ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२१ ची मतमोजणी बुधवार, १९ रोजी कुडाळ हायस्कुल, कुडाळ येथे सकाळी ८ वाजल्यापासुन सुरु होणार आहे. त्यामुळे या दिवशीचा आठवडा बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. कुडाळच्या आठवडा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने निवडणुक निकालाच्या दिवशी वाहतुकीस अडथळा निर्णाण होऊ नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडु नये, यासाठी १९ रोजीचा आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
याची सर्व व्यापारी व विक्रेत्यांनी नोंद घ्यायची आहे. तसेच मतमोजणी केंद्रावर लोकांची ये-जा नियंत्रित करणेसाठी या कालावधीत कुडाळ पोलीस स्टेशन चौक ते अभिमन्यु हॉटेलपर्यतचा रस्ता सकाळी ७.३० ते मतमोजणी पूर्ण होईपर्यत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यायी वाहतुक व्यवस्था पोलीस स्टेशन चौक ते एस. एन देसाई चौक मार्ग हॉटेल अभिमन्यु या मार्गाने वळविण्यात आलेली आहे, असे पत्रकात म्हटले आहे.