You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे नाव देशपातळीवर उज्ज्वल करण्यासाठी आमचे सर्व संचालक मंडळाचे प्रयत्न राहतील : मनिष दळवी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे नाव देशपातळीवर उज्ज्वल करण्यासाठी आमचे सर्व संचालक मंडळाचे प्रयत्न राहतील : मनिष दळवी

वेंगुर्ले येथे भाजप कडून दळवी यांचे भव्य स्वागत

वेंगुर्ले :

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आशीर्वादामुळे भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे व मतदारांच्या प्रेमामुळे विरोधकांनी मोठा विरोध करूनही मी सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत निवडून आणि आज या बँकेच्या अध्यक्षपदाचा बहुमान मला मिळाला हे माझे भाग्य समजतो. येणाऱ्या काळात बँक सर्वांसाठी चांगलं काम करेल आणि बँकेचे नाव देशपातळीवर उज्ज्वल करण्यासाठी आमचे सर्व संचालक मंडळाचे प्रयत्न राहतील असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी वेंगुर्ले येथे बोलताना व्यक्त केले.
वेंगुर्ले येथील भाजप कार्यालयात अध्यक्ष दळवी यांचे सायंकाळी आगमन होताच त्यांचे फटाक्यांची आतषबाजी करत सर्वांना पेढे भरून जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर तसेच बाबली वायंगणकर सोमनाथ टोमके, सारिका काळसेकर, सुजाता देसाई, पूनम जाधव, कृपा मोंडकर, वसंत तांडेल, प्रणव वायंगणकर, नाथा मडवळ, प्रसाद पाटकर, पप्पू परब, सायमन आल्मेडा, नितीन चव्हाण, ज्ञानेश्वर केळजी, जयंत मोंडकर, साईप्रसाद नाईक, विजय रेडकर, समीर चिंदरकर, आनंद गावडे, दादा केळुसकर, भूषण सारंग, साई भोई, मनवेल फर्नांडिस, कमलेश गावडे, अमेय धुरी, तुषार साळगावकर, शेखर कांनेकर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसंना देसाई यांनी तर आभार सुहास गवंडळकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा