You are currently viewing स्वामी विवेकानंद जयंती निमित्त मनसे सिंधुदुर्ग च्या वतीने वाचनालयाला पन्नास पुस्तके भेट

स्वामी विवेकानंद जयंती निमित्त मनसे सिंधुदुर्ग च्या वतीने वाचनालयाला पन्नास पुस्तके भेट

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त नेहमीच आपल्या सामाजिक उपक्रमांनी जनसेवा करणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांमार्फत कुडाळ तालुक्यातील केरवडे येथील श्री देव जगन्नाथ वाचनालयाला स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर आधारित पन्नास पुस्तके भेट दिली . गतवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने टोपीवाला वाचनालयाल, कुडाळ येथे स्पर्धा परीक्षा वर आधारित पंचवीस हजार रुपये किंमतीची पुस्तके भेट दिली होती. मनसेच्या या स्तुत्य उपक्रमाचे संपूर्ण गावात कौतुक होत असून वाचनालय मार्फत विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहेत.


सदर कार्यक्रम श्री देव जगन्नाथ मंदिर येथे संपन्न झाला . यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाअध्यक्ष धीरज परब , मनसे ग्रामपंचायत सदस्य सुशांत परब , सुबोध परब , श्री देव जगन्नाथ वाचनालय संचालक श्री विलास परब सर , श्री मनोहर परब सर , केरवडे देवस्थान प्रमुख श्री दिलीप परब , आदरणीय दत्ताराम परब ,न्हानू परब तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम मनोहर परब सर यांनी केले तर आभार श्री विलास परब सर यांनी मानले .

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − two =