You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व जलक्रीडा व्यवसाय सरसकट बंद न ठेवता निर्बंधासह चालू ठेवण्याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी आदेश द्यावेत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व जलक्रीडा व्यवसाय सरसकट बंद न ठेवता निर्बंधासह चालू ठेवण्याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी आदेश द्यावेत

 विष्णू मोंडकर जिल्हाध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग.

जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय कोरोना व्हायरस मुळे गेले दोन वर्षें बंदस्थितीतुन नोव्हेंबर पासून थोड्याफार प्रमाणात पूर्वपदावर येत असताना ओमिक्रोन व कोरोना च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरसकट पर्यटन स्थळे व जलक्रीडा व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश स्थानिक प्रशासनामार्फत देण्यात आले आहेत जे पूर्ण पणे चुकीचे असून जिल्ह्यातील पर्यटन स्थळे निर्बंधासह चालू करण्यात यावीत तसेच सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक,स्कुबा डायव्हिंग ,वाटरस्पोट जलक्रीडा व्यवसाय ५० % क्षमतेने कोविड निर्बंधाचे पालन करून सुरु करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी विनंती पर्यटन महासंघा तर्फे करण्यात येत असून सदर आदेशामध्ये बदल न झाल्यास या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या टूर गाईड,वाहन चालक,हॉटेल,रेस्ट्रॉरंट,रिक्षाचालक,स्कुबा डायव्हिंग,जलक्रीडा व्यावसायिक ,सिंधुदुर्ग किल्ला होडी चालक,होमस्टे धारक याच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे तसेच गेल्या दोन वर्षातील बँक हप्ते व्याज लाईटबील .पाणीबिल शासकीय कर यामध्ये स्थानिक प्रशासन व राज्य सरकार कडून कुठलीही मदत स्थानिक पर्यटन व अन्य व्यावसायिकांना मिळालेली नाही आजही पर्यटन व्यावसायिक या कर्जाच्या बोजातून बाहेर येण्यासाठी व्यावसायिक पातळीवर प्रयत्न करत आहे.तरी या विषयी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री उदय सामंत यांनी जिह्यातील पर्यटन स्थळे व जलक्रीडा व्यवसाय ,सिंधुदुर्ग किल्ला वाहतूक सेवा ५० % क्षमतेने कोव्हीड निर्बंधाचे पालन करून चालू ठेवण्याचे आदेश स्थानिक प्रशासनास द्यावेत अशी विनंती श्री विष्णु मोंडकर .जिल्हाध्यक्ष,पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग याच्यां वतीने करण्यात येत आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा