You are currently viewing दोघी

दोघी

काव्य आराधना, आम्ही साहित्यिक देशपांडे, अक्षर यात्री आदी समूहांच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अंजली देशपांडे यांची काव्यरचना

धन्य ती धरती,धन्य ती माता,एक उगवी धान्य,
एक जीवाची दाता…॥धृ॥

एक पोसे जगाला,एक वाढवी देहाला,पालन पोषण दोघींचे,सुख देई सार्‍याला,…॥१॥

कष्ट सोशी धरणी,धान्य देई विपुल,माता देई जन्म ,घरात येई छकुल…॥२॥

कर्तव्याला नाही चुकत,ऊन पाऊस थंडी वारा,खंबीर उभ्या त्या जागी,संकटाला नाही थारा…॥३॥

जगात नाही तोड, या दोघींच्या नात्यांना, जग चाले या चक्रावर देवत्व अर्पिले त्यांना….॥४॥

*अंजली देशपांडे*

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − two =