You are currently viewing वंदन

वंदन

जागतिक साहित्य कला व्यक्तीत्व विकास मंचचे ज्येष्ठ सदस्य कवी लेखक श्री अरविंदजी ढवळीकर यांची काव्यरचना

मी भाग्यवंत आहे हे आज मानले मी
जो भाग्य घडविणारा त्यालाच पूजिले मी ll
ते राम रूप वसले
ठायी तया अतर्क्य
गुरु माऊलीस माझ्या
काहींच ना अशक्य
विश्वास व्यापणाऱ्या तेजास स्पर्शिले मी ll
होती मनात इच्छा
सेवा अशी घडावी
ही भाव शब्द सुमने
पायी तुम्हा पडावी
हृदयात नाम मूर्ती ज्या सर्वस्व अर्पिले मी ll
पूर्णत्व द्या आयुष्या
राहो उणे न कांही
शिरी हात द्या कृपेचा
ना अन्य मागणे ही
हातास ही न कळले कि हात जोडले मी ll
हा जन्म हा प्रपंच
मी जाणून रंगमंच
द्या न्याय भूमिके मज
या दिग्दर्शना तुम्हीच
तव दर्शनात अवघ्या प्राणास वाहिले मी ll
मी भाग्यवंत आहे हे आज मानले मी ll
जो भाग्य घडविणारा त्यालाच पूजिले मी

अरविंद

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − four =