….ती…..

….ती…..

ती असावी तर तुझ्यासारखी,

सतत काळजी घेणारी,
हसत जरी असलो तरी,
माझ्या मनातलं ओळखणारी.

ती असावी तर तुझ्यासारखी,
माझ्या हाती हात देऊन,
आयुष्यभर सोबत करणारी.
दुःख मनी झाले तरी,
आपल्या मिठीत घेणारी.

ती असावी तर तुझ्यासारखी,
कधी रागावलो तरी,
प्रेमाने समजूत काढणारी.
आपल्या ओठांवरचे हास्य,
माझ्या ओठांवर देणारी.

ती असावी तर तुझ्यासारखी,
नयनी माझ्या अश्रू आलेच तर,
आपल्या पदराने पुसणारी.
गाली माझ्या हास्य पाहण्या,
दुःखही हसत झेलणारी.

ती असावी तर…
तुझ्यासारखीच….!!

(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा