You are currently viewing मालवण शिवसेना तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न

मालवण शिवसेना तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न

नूतन जिल्हा बँक संचालकांचा सत्कार

आ. वैभव नाईक, शिवसेना नेते सतीश सावंत यांची प्रमुख उपस्थिती

मालवण शिवसेना तालुका कार्यकारिणीची बैठक देवेज्ञ भवन येथे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी पक्ष संघटना वाढीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत निवडून आलेले महाविकास आघाडीचे जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डान्टस, सुशांत नाईक, मेघनाद धुरी यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,उपतालुका प्रमुख गणेश कुडाळकर, बाबा सावंत,शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, बाळ महाभोज, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, मंगेश गावकर, नितीन वाळके, विजय पालव, अमित भोगले, पं. स. सदस्या निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर, पूनम चव्हाण, श्वेता सावंत, दीपा शिंदे, रश्मी परुळेकर, नंदा सारंग, अंजना सावंत, भारती आडकर, मंदार ओरोसकर, प्रसाद मोरचकर, दीपक देसाई आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा