You are currently viewing निरवडे, डेगवे येथे चालत्या एसटीवर दगडफेक

निरवडे, डेगवे येथे चालत्या एसटीवर दगडफेक

सायंकाळची घटना; एसटीचे मोठे नुकसान

सावंतवाडी

सावंतवाडी ते शिरोडा आणि दोडामार्ग ते सावंतवाडी या दोन्ही एस्टी बसवर अनुक्रमे निरवडे आणि डेगवे येथे अज्ञाताने दगडफेक केली आहे. ही घटना आज सायंकाळी घडली असून, सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. परंतु, एकाचवेळी घडलेल्या या दोन घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती आगार प्रमुख नरेंद्र बोधे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + eighteen =