You are currently viewing राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाट हायस्कूलच्या कलाकारांची निवड

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाट हायस्कूलच्या कलाकारांची निवड

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाट हायस्कूलच्या कलाकारांची निवड

श्रुतिका मोर्ये, सुमन गोसावी, पवन प्रभू यांचे अभिनंदनीय यश

कुडाळ

कला उत्सव ही कलाविषयक शासकिय स्पर्धा राज्य स्तरावर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागात राबवली जाते यामध्ये पाट हायस्कूलच्या कलाकारांनी यश संपादन केले त्यामुळे पाट पंचक्रोशीत त्यांचे कौतुक होत आहे
दरवर्षी राज्य स्तरावर विविध कला प्रकारात ही मुले यश संपादन करीत आहेत पाट हायस्कूलच्या कै. मा एकनाथजी ठाकूर कला अकादमी मार्फत विविध कलाविषयक उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये या मुलांचा सक्रिय सहभाग असतो. या विद्याथ्यापैकी शास्त्रीय गायनामध्ये कुमार सुमन गोसावी प्रथम क्रमांक, शास्त्रीय वादनामध्ये पवन प्रभू प्रथम क्रमांक, तर पखवाज वादनामध्ये श्रुतीका मोर्ये हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. या सर्व विद्यार्थ्यांची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. एस के पाटील शिक्षण प्रसारक पाट पंचक्रोशी संस्थेचे पदाधिकारी यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. यावेळी मुलांसोबत मुख्याध्यापक शामराव कोरे, पर्यवेक्षक राजन हंजनकर, कलाशिक्षक संदीप साळसकर आणि इतर शिक्षक उपस्थित होते. राज्यस्तरीय होणाऱ्या स्पर्धेसाठी या मुलांना शुभेच्छा देण्यात आल्या. निश्चितच मोठेपणीही एक चांगला कलाकार म्हणून विद्यार्थी नाव कमवतील असा संस्थेतर्फे विश्वास दर्शविण्यात आला.

*संवाद मीडिया*

🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧

*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*

*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा