You are currently viewing ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शाळा,महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद – उदय सामंत

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शाळा,महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद – उदय सामंत

मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, परीक्षा-अभ्यासक्रम ऑनलाईन सुरू…

मुंबई

कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शाळा,महाविद्यालये पुन्हा एकदा १५ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. दरम्यान या काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग सुरु राहणार असून परीक्षासुद्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. तर ज्या जिल्ह्यात नेटवर्कची समस्या आहे. त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार “ऑफलाईन” परीक्षा घेण्यासंदर्भात नियोजन करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याबाबत श्री. सामंत यांनी ऑनलाईन पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

ते पुढे म्हणाले, राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असल्यामुळे राज्य शासनाने शाळा महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या काळात ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू राहणार आहे. तर या काळात होणाऱ्या परीक्षासुद्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. दरम्यान ज्या ठिकाणी नेटवर्कची समस्या तसेच विद्यार्थी किंवा घरातील व्यक्ती कोरोना बाधित आढळल्यास त्याची परीक्षा पुन्हा घेण्यासंदर्भात निर्णय होणार आहे. ज्यामुळे कुठलाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. तर ज्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नेटवर्कची समस्या आहे, अशा ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्या जातील, मात्र याचे नियोजन व निर्णय जिल्हाधिकारी करतील, असे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + fourteen =