बांदा
जिल्हा परिषद केंद्र नं.१शाळेसह सर्वच शाळांतून सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या राजमाता जिजाऊ
यांची जयंती व पहिल्या महिला शिक्षिका सिवित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ या अभियानांतर्गत विद्यार्थी व शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रमाचे ३जानेवारी ते १२जानेवारी २०२२या कालावधीत करण्यात आले आहे .या कार्यक्रमाची सुरवात बांदा नं १केंद्रशाळेत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली .
या दिवशी बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थीनींनी सावित्रीबाई फुले यांच्या लक्षवेधी वेशभूषा साकारल्या होत्या .या वेळी वीद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला.
यावेळी अंगणवाडी सेविका मानसी मनोज बांदेकर यांनी शाळेसाठी राजमाता जिजाऊ यांचा फोटो भेट दिला. या दिवशीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेतील विद्यार्थीनी चैतन्या तळवणेकर हिने स्विकारले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वरी वाळविये व लौकिक तळवडेकर या विद्यार्थ्यांनी केले तर आभार ऋतुजा वडर हिने मानले. या दिवशी दुपारच्या सत्रांत विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळातून विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शिक्षक व पालक यांनी परिश्रम घेतले.