You are currently viewing आमदार नितेश राणे यांच्या जमीनावर उद्या होणार निर्णय

आमदार नितेश राणे यांच्या जमीनावर उद्या होणार निर्णय

ओरोस

न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज दोन्ही पक्षाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही.हांडे यांच्या समोर हा युक्तिवाद झाला.जामिनासंदर्भात उद्या बुधवारी ९ फेब्रुवारी रोजी निर्णय दिला जाईल असे न्यायालयाने सांगितले.
सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने आज मंगळवारी जामिनावर न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला. यावेळी आमदार नितेश राणेंचे वकिल,जेष्ठविधीतज्ज्ञ सतीश मानेशिंदे,वकील संग्राम देसाई यांनी युक्तिवाद केला.तर सरकारी पक्षाच्या वतीने वकील प्रदीप घरत,वकील साळवी यांनी युक्तिवाद केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × four =