You are currently viewing उपकार

उपकार

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमराणी यांची अप्रतिम काव्यरचना

पदरात काटेकुटे
तरीही हसते माय
माझी माय मला भासे
जशी दुधावरी साय

चुलीतला जाळधूर
फुंकता कसा हसतो
बाभूळकाटा जळता
हळू हाताला डसतो

डोळाभर धूरपूर
चुलीत फुंकर मारे
पेट घेताच काटक्या
दुःख दूर पळे सारे

फाटक्या त्या पदराने
घाम पुसे हळू माय
धग सोसल्या हाताच्या
रोटीत अमृत हाय

लाल हिरव्या मिर्च्या
वर लसणांच्या फोडी
मायच्या हातचा खर्डा
भाकरीला येई गोडी

चुलीवरचा तवाही
आईला बघून हसे
आईचे हे उपकार
विसरू मी सांगा कसे ?

©मुबारक उमराणी
सांगली
९७६६०८१०९७.

प्रतिक्रिया व्यक्त करा