You are currently viewing वयांत आलेले क्षण….!!

वयांत आलेले क्षण….!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वयांत आलेले क्षण….!!*

 

व्हायचं ते होत राहिलं

वेळ काढून हसून घ्यावं

अभावातून स्वभावाकडे जाताजाता

कधीकधी वयालाही विसरून जावं

 

प्रश्न येतील जातील

उत्तरांचा शोध सुरू राहिलं

आपल्या चालीनं चालत राहावं

शरीरमन बुध्दीबाहेर पळत जाईलं

 

कधीकधी वयांत आलेले क्षण

गुपचूप लपवावेसे वाटतांत

अल्लड अवखळ उनाड मनाला

उगाच आकडेमोड करायला लावतांत

 

वयांत आलेल्या क्षणांच्या वेदना

तश्या कुणालाचं कळतं नाही

ते क्षण मनाच्या तळाशी लपतात

नंतर कुणी मनावर घेत नाही

 

फुलपंखी निरागस हास्यालाही

कधीकधी वयाचा कडवटपणा येतो

वय झालेल्या क्षणांचा आवाज

तोच काळजाला दागण्या देतो

 

व्हायचं ते होत राहिल….त्या क्षणांचं

वेळ काढून आपण मात्र हसून घ्यावं

व्हायचं ते होत राहिल…त्या वयाचं

 

बाबा ठाकूर धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा