You are currently viewing श्रीकांत उगवेकर यांना प्राईड ऑफ इंडिया भास्कर भूषण राष्ट्रीय पुरस्कार
  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

श्रीकांत उगवेकर यांना प्राईड ऑफ इंडिया भास्कर भूषण राष्ट्रीय पुरस्कार

महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन मार्फत दिल्या जाणाऱ्या प्राईड ऑफ इंडिया, भास्कर भूषण राष्ट्रीय पुरस्काराने श्रीकांत उगवेकर यांना नुकतेच गौरविण्यात आले.

या फौंडेशन मार्फत 15व्या राष्ट्रीय पुरस्कारांचे पर्वरी गोवा येथे शानदार वितरण करण्यात आले.सांस्कृतिक कार्यक्रमांचेही यावेळी आयोजन करण्यात आले होते. माजी केंद्रीय मंत्री ऍड. रमाकांत खलप, गोवा कामगार नेते अजितसिहं राणे, पदमश्री विनायक खेडेकर,गोवा विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, संस्थेचे अध्यक्ष राजीव लोहार व इतर मान्यवर उपस्थित होते.

शिक्षण, कला, संगीत, सामाजिक कार्य वैद्यक, या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून देश घडविणाऱ्या 40व्यक्तींना हा राष्ट्रीय बहुमान देऊन गौरविण्यात आले. राज्य राष्ट्रीय, व आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली 15वर्षे अखंड पणे ही संस्था काम करत आहे.

बालशिक्षण, कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल श्री श्रीकांत पांडुरंग उगवेकर यांना यावेळी प्राईड ऑफ इंडिया भास्कर भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. श्री उगवेकर कुसबे नं 1ता. कुडाळ येथे कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या वेळी श्री राजन कोरगावकर, दादा जांभवडेकर नंदकुमार राणे, किसन राठोड श्रीकृष्ण सावंत, सहकारी शिक्षक मानसी सावंत, निलेश ठाकूर, जगदीश उगवेकर, निलेश उगवेकर, श्रेया उगवेकर व मित्र मंडळी यांनी उपस्थित राहून पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा