तळेरे हायस्कूल मध्ये सामाजिक वनीकरण व हरित सेना विभागातर्फे वनक्षेत्र भेट माहिती व प्रश्नमंजूषा स्पर्धा
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक वनिकरण विभाग सिंधुदुर्ग तसेच हरितसेना विभागामार्फत वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला , वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात वनक्षेत्र भेट माहिती , तसेच प्रश्नमंजूषा स्पर्धा नुकतीच पार पडली. यावेळी कणकवली परिक्षेत्राचे वनाधिकारी विनोद बेलवाडकर , वनपाल किशोर जंगले, शिवाजी इंदूलकर , वनरक्षक दिप्पर , एस.जी. नलगे , ए.एस. मांजरेकर , एन.बी. तडवी, सी.व्ही काटे, आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यालयातील ४७ विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.
वनाधिकारी बेलवाडकर यांनी वनक्षेत्र भेटीदरम्यान वैविध्यपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच परिसरातील झाडे व त्यांचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. दुपारच्या सत्रात प्रश्नमंजूषा स्पर्धा विद्यालयात घेण्यात आली . यामध्ये इयत्ता आठवीमधील विद्यार्थीनीं वैष्णवी श्रीकृष्ण चव्हाण हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय क्रमांक प्रियल अमृते , चिन्मयी चव्हाण , स्वानंदी डंबे, समिक्षा पाटणकर यांना प्राप्त गुणांनुसार विभागून देण्यात आला . प्रश्नमंजूषा स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग अंतर्गत रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस.जी.नलगे यांनी केले तर सूत्रसंचालन ए.एस. मांजरेकर व आभार सी.व्ही काटे यांनी मानले.