You are currently viewing कणकवलीत संत रोहिदास प्रासादीक भजन मंडळ करंजे व बुवा गजानन करंजेकर आयोजित स्वरांजली अभंगगाथा कार्यक्रम

कणकवलीत संत रोहिदास प्रासादीक भजन मंडळ करंजे व बुवा गजानन करंजेकर आयोजित स्वरांजली अभंगगाथा कार्यक्रम

कणकवली :

दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीलाच भजन कला जोपासण्यासाठी स्वरांजली अभंगगाथा हा संगीतमय कार्यक्रम राबविणे हा स्तुत्य उपक्रम असून ही चळवळ कायम चालू रहावी असे प्रतिपादन मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे यांनी करंजे येथे केले.

संत रोहिदास प्रासादीक भजन मंडळ करंजे व बुवा गजानन करंजेकर आयोजित स्वरांजली अभंगगाथा कार्यक्रम करंजे ता.कणकवली येथे पार पडला.यावेळी उद्घाटक म्हणून मालवण पं. स.सभापती अजिंक्य पाताडे, सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ जिल्हाध्यक्ष सुजित जाधव,जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे हे उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक महानंद चव्हाण, कणकवली सचिव आनंद जाधव,करंजे तंटामुक्ती अध्यक्ष श्री.परब,भजन मंडळ अध्यक्ष बाळा करंजेकर,जिल्हा मंडळाचे पदाधिकारी महेंद्र चव्हाण,अमित चव्हाण,बुवा गजानन करंजेकर,भारत पेंडुरकर,चिंतामणी पवार,सूरज चव्हाण आदी उपस्थित होते.

कार्यक्रमास अनेक नामांकीत बुवांनी आपली अभंगवाणी सादर केली.यात नवोदित बुवांनी सुद्धा आपली कला सादर केली.उपस्थित सर्व भजनी बुवा व पखवाज वादक यांचा सत्कार करण्यात आला. बुवा गजानन करंजेकर यांचा यावेळी वाढदिन साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना सुजित जाधव यांनी सदर कार्यक्रम स्तुत्य असून जिल्हा मंडळाच्या वतीने असा उपक्रम राबविणेसाठी प्रयत्न करू असे सांगितले.चंद्रसेन पाताडे यांनी भजन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी हा छोटा प्रयत्न यापुढे जाऊन व्यापक होईल असा विश्वास व्यक्त केला. बुवा गजानन करंजेकर यांनी या कार्यक्रम आयोजनात आपण नाममात्र असून सर्व मेहनत येथील मंडळाचे कार्यकर्ते घेतात.भजन कला अविरत चालू ठेवण्यासाठी हा कार्यक्रम गेले 5 वर्षे आपण राबवित आहे असे सांगितले.

यावेळी श्री.परब,श्री.महानंद चव्हाण यांचीही भाषणे झाली.यावेळी बुवा गजानन करंजेकर यांचा सत्कार करण्यात आला.तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार मंडळाचे वतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.प्रेरणा खेडेकर हिने केले.आभार बुवा गजानन करंजेकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा