You are currently viewing राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या मान सन्मासाठी पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेची शिक्षण आयुक्तकार्यालयात भेट

राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या मान सन्मासाठी पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेची शिक्षण आयुक्तकार्यालयात भेट

पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयात अमरावती विभागाचे आमदार मा श्रीकांत देशपांडे व शिक्षण आयुक्त डॉ मा. विशाल सोळंकी साहेब शिक्षण संचालक (प्राथमिक) मा.दिनकर टेमकर , शिक्षण संचालक माध्यमिक मा महेश पालकर साहेब यांची आज राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट या संघटनेच्या वतीने भेट घेऊन आपल्या मागण्या विषयी निवेदन देऊन चर्चा केली आहे.

निवेदनात राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना कायम स्वरूपी ओळखपत्र ,दोन जादा वेतनवाढी , सर्वसाधारण बदल्या मध्ये संवर्ग एक मध्ये समावेश, स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य राज्य शासनाच्या विविध समित्यांवर राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना समाविष्ट करणे . रेल्वे बस सवलतीच्या दरात प्रवासाबाबत ,2020 व2021 राज्य पुरस्कार सोहळा आयोजन करून उपक्रमशील शी शिक्षकांचा सन्मान करणे बाबत अशा मागण्यांचे निवेदन माननीय आयुक्त कार्यालय पुणे व माननीय शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक यांचे कार्यालयात संघटनेच्यावतीने देण्यात आले.

चर्चा सकारात्मक झाली असुन कायम स्वरुपी राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना ओळख पत्र लवकरात लवकर देण्याबाबत कार्यवाही केली जाईल व उर्वरीत मागण्या पुर्ततेसाठी आपले निवेदन राज्य शासनाकडे पाठविलेले जाईल . आपल्या मागण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल येतील .असे आश्वासन आमदार श्रीकांत देशपांडे यांनी दिले तर मागण्यांचे निवेदन शिक्षण आयुक्त कार्यालयात आयुक्त साहेब यांच्या वतीने श्रीराम पानझडे शिक्षण उपसंचालक प्रशासन व डॉ वंदना वाहूळ उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक ,व स्वीय सहाय्यक महेंद्र कुलकर्णी, यांनी स्वीकारले.

यावेळी राज्याध्यक्ष -सुभाष जिरवणकर,राज्यकार्याध्यक्ष दशरथ शिंगारे ,सरचिटणीस – आनंता जाधव ‘सहसचिव माधव वायचाळ,उपाध्यक्ष संभाजी ठुबे राज्य प्रवक्ता सुनिल गुरव , जिल्हाध्यक्ष – शिवराज सावंत – सिंधुदुर्ग , ‘रमेश गंगावणे -हिंगोली ‘ भिमराव शिंदे पुणे ,हिंगोलीसचिव -संजय गिरी, आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 5 =