You are currently viewing स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा पनवेलच्या पिल्लाई इन्स्टिट्यूट सोबत सामंजस्य करार

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा पनवेलच्या पिल्लाई इन्स्टिट्यूट सोबत सामंजस्य करार

सिंधुदुर्ग

नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व महाविद्यालयांना इतर संस्थांशी जोडले राहणे आवश्यक आहे, विद्यार्थ्यांना अधिकाधिक चौफेर ज्ञान मिळवून देण्याच्या दृष्टीने मोठ्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थां सोबत विविध उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाने पनवेल येथील महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लाई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सोबत Memorandum of Understanding म्हणजेच सामंजस्य करार केला आहे. हा करार पुढील तीन वर्षांसाठी लागू राहणार असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अध्ययन अध्यापनाच्या विविध नाविन्यपूर्ण संधी होणार आहेत.

या करारामध्ये सिमुलेशन गेम्स वर्कशॉप, कम्युनिकेशन स्किल्स वर्कशॉप, एक्सपर्ट सेशन्स, गेस्ट लेक्चर्स, सेमिनार, ट्रेनिंग सेशन इत्यादी बाबींचा समावेश असणार आहे. हा सामंजस्य करार म्हणजे महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगती मधील एक मोठे पाऊल आहे, असे मत सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी व्यक्त केले. इन्स्टिट्यूट च्या प्राचार्यांच्या वतीने प्राध्यापक अभिमन्यू रॉय यांनी तसेच सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉक्टर ठाकूर यांनी करारावर सह्या केल्या. यावेळी महाविद्यालयाच्या आयक्यूएसी कोऑर्डिनेटर प्रा. डॉ. सुमेधा नाईक, प्रा.डॉ. उज्वला सामंत आणि महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक कैलास साळुंखे हे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − 1 =