You are currently viewing काय लाभले… काय गेले..

काय लाभले… काय गेले..

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांची काव्यरचना

मनातील भीतीच्या छायेत
होते नवीन वर्ष ते आले
काय लाभले…काय गेले
विचारांनी त्या मन पोखरले

मरणापेक्षाही झाली होती
जगण्याचीच स्वस्त भीती
आठवतात जगण्यासाठी
जागलेल्या कित्येक राती

चालता बोलता माणसे गेली
डोळ्यांसमोर दिवसाकाठी
क्रियाकर्म सबकुछ हे झूठ
रोग भयंकर ज्याच्या गाठी

बांधूनी तोंड बैलांसारखे
सण सोहळे साजरे झाले
कोवाक्सिन कोव्हीशिल्ड
आधार जीवनाचे बनले

दिवस सरले वर्ष ही गेले
नकळत कधी भुर्रर्र उडून
काय मिळविले न समजले
सौभाग्याचे ते लेणे पुसून

©[दिपी]✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 11 =