सावंतवाडी
आजगाव येथील प्रा. रुपेश पाटील यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व लोकप्रबोधन क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा व विधायक ठसा उमटविला आहे. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग सामाजिक परिवर्तनासाठी उपयुक्त ठरत असल्यामुळे त्यांना कोल्हापूर येथील ‘इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन रिसर्च सेंटर, कला, साहित्य व सामाजिक लोकसंवाद प्रतिमा संमेलन २०२१’ मध्ये राष्ट्रीय स्तरावरील ‘भारत प्रतिमा गौरव पुरस्कार २०२१’ देऊन गौरविण्यात आले.
सुप्रसिद्ध सिनेअभिनेते तथा ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील ‘अण्णा’ माधव अभ्यकंर यांच्या हस्ते ‘भारत प्रतिमा गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. प्रा. पाटील यांनी आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र, गोवा राज्यात अनेक ठिकाणी सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर आपल्या व्याख्यानांमधून प्रबोधन केले आहे. ज्यामुळे सामाजिक जनजागृती करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. प्रा. पाटील यांना आजपर्यंत अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा त्यांचा शासनस्तरावर पुरस्कार देऊन गौरवही केला आहे. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रा. रुपेश पाटील यांच्या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.