You are currently viewing सरत्याला निरोप …
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

सरत्याला निरोप …

माझी लेखणी साहित्य मंचच्या संस्थापिका लेखिका कवयित्री आम्रपाली घाडगे यांचा सरत्या वर्षाला निरोप देणारा अप्रतिम लेख

सर्वप्रथम धन्यवाद चराचराला ऊर्जा देणाऱ्या आणि आळस न करता दररोज उगवणाऱ्या त्या भास्कराला, यात दोन गोष्टी लक्षात येतात पहिली नियमितपणा आणि दुसरी म्हणजे निःस्वार्थी पणे दुसऱ्यांना देण्याची वृत्ती.हे वर्ष पण आले आणि पाहता पाहता त्या वर्षाला निरोप द्यायची वेळ आली.काय दिले या वर्षाने? हाच एकमेव प्रश्न सर्वांच्या मनात येत असेल.? हो ना? आपण काय दिले (या वर्षात किंवा वर्षाला) हा प्रश्न कदाचित नाही येणार शेवटी मानवीवृत्ती घ्यायचं माहिती द्यायचा मक्ता फक्त निसर्गाने घेतलेला आहे ,असेच ना पण खरे प्रामाणिकपणे सांगा आपण यासाठी या वर्षात काय केले.
पर्यावरण दिवशी टीव्हीवर, वृत्तपत्रातून किँवा विविध माध्यमातून आपण ऐकतो आणि फक्त प्रसार करतो पर्यावरणाचे रक्षण करू, झाडे लावू झाडे जगवू तेही फक्त एक दिवसासाठी आणि दुसऱ्या दिवशी दुसरा कुठला तरी दिनविशेष असतो म्हणून कालचा दिवस विसरून जातो.एक वर्ष तुम्हाला ³⁶⁵ दिवस देतं आणि तुम्हाला सांगते की त्यातला फक्त एक दिवसच दिनविशेष नाही तर ³⁶⁵ दिवस ही विशेष असतात आणि त्या दिवसाचा उपयोग स्वतः साठी तर करा इतरांसाठी पण काहीतरी विशेष करा.द्या आणि घ्या नियमानुसार म्हणजेच एक झाड लावा त्याचा फायदा सावली म्हणून माणसासाठी आणि अप्रत्यक्षरीत्या निसर्गासाठीही होतो त्याचप्रमाणे चांगले कर्म करा आता चांगले कर्म म्हणजे नेमकं काय जास्त खोलात न सांगता फक्त इतकच म्हणेन की चांगले कर्म करणे म्हणजे आपल्या ओंजळीतलं थोड सूख दुसऱ्याच्या रिकाम्या ओंजळीत घालणं.
म्हणूनच मी इथे सुरुवातीला भास्कराचे आभार का मानले आणि त्याची देण्याची वृत्ती असते असे का म्हणाले ते तुमच्या लक्षात आलेच असेल.माणसा सोबतच आपण पशुपक्ष्यांची पण सेवा करावी सेवा करणे म्हणजे अगदी कुरवाळीत नाही बसायचं पण कमीत कमी जी मोकार जनावरं रस्त्यावर गल्लोगल्ली फिरतात त्यांना मुद्दाम त्रास देणाऱ्या लहान अल्लड माणसांना समजून सांगावे. म्हणजे इथे आपण त्या मुक्या जीवाला तर सुख दिलं म्हणजेच चांगलं कर्म केलं आणि एका वर्षात असेच तुम्ही कित्येक चांगले कर्म करू शकतात ते करत असताना चांगले वाईट पण अनुभव येतील चुकाही होतील पण त्यातून शिकून आणि त्याच चुकीची सुधारणा करून आपण परत एक दुसरे नवीन चांगले कर्म करू शकतो.
वर्ष येतं वर्ष जातं आणि जाणाऱ्या वर्षाला आपण नावं ठेवतो मनुष्यप्राण्याच्या हे लक्षात येत नाही की आपण आपल्यालाच नावं ठेवत असतो आपण आपल्या वरच नाराज होत असतो आपण आपल्याच केलेल्या वाईट कर्मावर बोलत असतो.हं दुःखाचा विषय सोडला, किंवा आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला कायमची सोडून गेली ते दुःख म्हणून आपण म्हणू शकतो की हे वर्ष माझ्यासाठी वाईट होत किंवा चांगले ठरले नाही.पण बाकी गोष्टीसाठी सरत्या वर्षाला निरोप देताना त्याचे आभार मानून की हे सरत्या वर्षा तू अनुभवातून शिकण्याची संधी देऊन परत एक नवीन वर्ष आमच्या आयुष्याच्या झोळीत दान म्हणून टाकत आहेस आणि तू दिलेल्या दानाचां उपयोग आम्ही इतरांना या ना त्या प्रकारे वाटून सुखी करू.

2022 वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे आरोग्यदायी आनंदाचे भरभराटीचे जावो हीच सदिच्छा

आम्रपाली घाडगे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 5 =