You are currently viewing हिर्लोक येथे आज 31 डिसेंबरला ट्वेंन्टी ट्वेंन्टी डबलबारी भजन सामना 

हिर्लोक येथे आज 31 डिसेंबरला ट्वेंन्टी ट्वेंन्टी डबलबारी भजन सामना 

कुडाळ :

भजन स्पर्धा पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि 31 डिसेंबरचे औचित्य साधुन आज शुक्रवार दि.31 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता हिर्लोक हायस्कूल पटांगण येथे 20 × 20 डबलबारी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला आहे.

लिंग रवळनाथ माऊली उत्कर्ष समिती हिर्लोक किनळोस तसेच भजनप्रेमी हिर्लोक यांच्यावतीने हा सामना आयोजित करण्यात आला आहे. श्री गवळदेव प्रासादिक मंडळ, डिगस (जाधववाडी)चे बुवा केशव मोहिते (पखवाज अक्षय माळके व तबला सुरज पालव) विरूध्द विघ्नेश्वर प्रासादिक भजन मंडळ(हुमरस)चे बुवा संतोष परब (पखवाज भुषण परब व तबला शुभम नाईक) यांच्यात हा ट्वेन्टी ट्वेन्टी डबलबारी भजन सामना होणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा