You are currently viewing जि. प. अध्यक्षांना शिवीगाळ भोवली : शिवसेना नेते सतीश सावंत यांच्यावर गुन्हा दाखल

जि. प. अध्यक्षांना शिवीगाळ भोवली : शिवसेना नेते सतीश सावंत यांच्यावर गुन्हा दाखल

कणकवली

जिल्हा बँक मतदानावेळी कणकवली तहसिलदार कार्यालयातील मतदान केंद्रात जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांना शिवीगाळ करून धमकी दिल्या प्रकरणी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या विरोधात भादवि कलम ५०९, ३५१, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संजना सावंत यांनी फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार तहसील कार्यालयातील मतदान रांगेत उभे असताना सतिश जगन्नाथ सावंत, रा. भिरवंडे, ता. कणकवली हे मतदान केंद्रावर मोबाईलवर बोलुन आचारसंहितेचा भंग करीत होते. फिर्यादी यांनी ते तेथे बंदोबस्ताकरीता उपस्थित असलेल्या पोलीसांच्या निदर्शनास आणून दिले. त्याचा राग सतिश सावंत यांनी मनात धरुन मला ‘ आलतु फालतु लोकांच मी ऐकुन घेणार नाही. ‘आलतु – फालतु लोकांच मी ऐकुन घेणार नाही. म्हणत, तुझी लायकी काय, तु काय आहेस ते मला माहीत आहे. असे बोलून आई – बहिणीवरुन शिवीगाळी करुन माझ्या मनात लज्जा निर्माण केली. तसेच उमेदवार सौ. प्रज्ञा प्रदीप ढवण यांना तुझे दात तोडून टाकेन असे बोलुन हड – हड करीत शिवीगाळ करुन फिर्यादी व प्रज्ञा ढवण यांच्या अंगावर धक्काबुक्की करण्यासाठी धावुन आले अशी फिर्याद संजना सावंत यांनी दिली आहे. त्यानुसार कणकवली पोलिसात सतीश सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा