You are currently viewing कणकवली पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकारी दाखल…

कणकवली पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकारी दाखल…

शहरात पोलीस बंदोबस्त वाढवला; अटकपूर्व जामिनाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष…

कणकवली

कणकवली पोलीस ठाण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर दाखल झाले आहेत. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी हजर राहण्याची नोटीस बजावल्याने पोलीस ठाण्यात हालचालींना वेग आल्याचे चित्र आहे. दरम्यान शहरात ही ठिकठिकाणी पोलीस कुमक वाढवण्यात आली.
शिवसैनिक संतोष परब यांच्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन बाबत सुनावनीची प्रक्रिया कोर्टात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर असून जिल्हा सत्र न्यायालयाच्या सुनावणीकडे राज्यासह जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा