You are currently viewing स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त जिल्हा परिषदेच्या विविध स्पर्धांचे उद्घाटन

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त जिल्हा परिषदेच्या विविध स्पर्धांचे उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सानिमित्त जिल्हा परिषदेतर्फे आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करा, असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी केले. जिल्हा परिषदेतर्फे आयोजित विविध स्पर्धांचे आज येथील छत्रपती शिवाजी सभागृहामध्ये उपाध्यक्ष श्री. म्हापसेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.

                यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख, जिल्हा परिषद सदस्य शेता कोरगावकर, माजी जिप उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, यांच्यासह जिल्हाभरातील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

                अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत 5 वीं ते 12वी च्या  विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, रांगोळी, निबंध, वक्तृत्व अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा देताना उपाध्यक्ष श्री म्हापसेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात चित्रकार निर्माण व्हावेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन नियमित सराव आणि चांगले मार्गदर्शन घ्यावे, असे प्रतिपादन केले. तर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नायर यांनी स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

                पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी व अकरावी-बारावी अशा तीन गटात या स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेतील प्रत्येक गटात व प्रत्येक स्पर्धा प्रकारात 24 विद्यार्थी अशा एकूण 72 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. छत्रपती शिवाजी सभागृह येथे चित्रकला स्पर्धा तर स्काऊट गाईड व माध्यमिक शिक्षक पथपेढीच्या सभागृहामध्ये रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये प्रथम तीन क्रमांक मिळविलेले विद्यार्थी  या जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी झाले असल्याची माहिती, शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + five =