You are currently viewing इचलकरंजीत राष्ट्रीय काँग्रेसचा 136 वा वर्धापन दिन साजरा

इचलकरंजीत राष्ट्रीय काँग्रेसचा 136 वा वर्धापन दिन साजरा

इचलकरंजी / प्रतिनिधी :

 

देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्वपूर्ण योगदान देणा-या अखिल भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचा 136 वा वर्धापन दिन इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी कार्यालयात कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष नगरसेवक संजय कांबळे यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सचिव ,नगरसेवक शशांक बावचकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी कार्यालयात अखिल भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचा 136 वा वर्धापन दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष नगरसेवक संजय कांबळे यांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी शहर अध्यक्ष संजय कांबळे यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील कॉग्रेस पक्षाचे योगदान व स्वातंत्र्योत्तर काळातील देशाची प्रगती याचा आढावा घेऊन कॉग्रेस पक्ष अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर व नगरसेवक राहुल खंजीरे यांनी देखील आपल्या मनोगतात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची परंपरा व या पक्षाने देशाच्या स्वातंत्र्य चळवळीबरोबरच देशाच्या विकासात दिलेले मोठे योगदान याचे विविध संदर्भ देत मार्गदर्शन केले.

यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष शशिकांत देसाई, काँग्रेस महिला आघाडी पदाधिकारी सौ. मिना बेडगे, युवक अध्यक्ष युवराज शिंगाडे, समिर शिरगावे, मुन्ना खलिफा, सोहेल बाणदार, योगेश कांबळे, आलम मुजावर, रियाज जमादार, अजित मिणेकर , सतिश कांबळे, शशिकांत पाटील, विजय लायकर, दिलीप पाटील, अनिल कदम, मारुती कोरवी, प्रशांत लोले, रवि वासुदेव , अमिर सपसागर, शौकत मुल्ला, महेश माळी, गोविंद आढाव, ताहिर खलिफा, ताहीर शिरगावे, नामदेव कोरवी, बंडू नेजे, संग्राम घुले, विजय मुसळे, प्रमोद मुसळे, युवराज कांबळे, सौ. अनिता बिडकर, सौ. बिसमिल्ला गैबान, सौ.विद्या कळंत्रे , प्राजक्ता कळंत्रे , पायल हणबर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा