रणजित देसाई यांनी माहिती घेऊनच आरोप करावेत….
शिवसेना नेते अतुल बंगे

रणजित देसाई यांनी माहिती घेऊनच आरोप करावेत….

रणजित देसाई यांनी माहिती घेऊनच आमदारांवर आरोप करावेत :- शिवसेना नेते अतुल बंगे

चौके धामापूर कुडाळ प्रजिमा ४१ या रस्त्याच्या सुधारणा व डांबरीकरणासाठी आमदार वैभवजी नाईक यांनी सांगितल्याप्रमाणे ३ कोटी २१ लाख रुपये निधी मंजूर होऊन त्या कामाची रीतसर ई निविदा सूचना नं ५३ जाहिरातीद्वारे दि. ११/०२/२०२० ते २५/०२/२०२० या कालावधी करिता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली होती.

परंतु कोणत्याही ठेकेदाराकडून या निविदे करीता मागणी प्रस्ताव आलेला नाही. संपूर्ण राज्यामध्ये कोरोना आजाराचा प्रादुर्भाव असल्याने कोणतेही ठेकेदार हि निविदा भरू शकले नाहीत. तरी आता पुन्हा या कामाची ई निविदा करण्यात आलेली असून हे काम निविदा उघडण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. त्यामुळे हे काम मंजूर झालेलं असून याची निविदा प्रक्रियाही झालेली होती. त्यामुळे अर्धवट माहिती असलेले रणजित देसाई हे फुकाचे श्रेय घेण्यासाठी केवळ राजकीय स्टंटबाजी म्हणून आमदार महोदयांवर आरोप करत आहेत. त्यांचे हे आरोप पूर्णतः चुकीचे आहेत. असे शिवसेना नेते अतुल बंगे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा