You are currently viewing झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त “कर्तृत्ववान महिलांचा गौरव सोहळा”

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त “कर्तृत्ववान महिलांचा गौरव सोहळा”

भाजपा कुडाळ महिला शहराध्यक्षा सौ मृण्मयी तथा ममता धुरी यांचा स्तुत्य उपक्रम

वीरता, जिद्द आणि असीम धैर्याचे प्रतिक असलेल्या राणी लक्ष्मीबाई उर्फ झाशीची राणी यांची जयंती कुडाळ शहर भाजपाने अतिशय कौतुकास्पद उपक्रमासह साजरी केली आहे. कुडाळ भाजपा कार्यालयात आज शहरातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सोहळा महिला शहराध्यक्षा सौ मृण्मयी चेतन उर्फ ममता धुरी यांनी आयोजित केला. असीम शौर्याने ब्रिटिशांचे जोखड झुगारून देत स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे चरित्र सर्वांनाच प्रेरणादायक आहे. परंतु आज विकासाच्या वाटेवर आत्मविश्वासाने वाटचाल करण्यासाठी महिलांना ते सदैव प्रेरणादायी ठरणारे आहे, असे सौ ममता धुरी म्हणाल्या. त्यांच्या जयंतीचे निमित्त साधत कर्तृत्ववान महिलांचा सत्कार भाजपा कुडाळ शहर महिला आघाडीने आयोजित केला होता.

कुडाळ शहरातील महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला शहराध्यक्षा सौ ममता धुरी यांच्यासह शहर अध्यक्ष राकेश कांदे, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ संध्या तेरसे, सौ तेजस्विनी वैद्य, सौ मुक्ती परब, सौ साक्षी सावंत,सौ लक्ष्मी पाटील, सौ मोहिनी राणे, सौ जयश्री कुंभार, स्मिता शिरसाट, प्रतिभा रेवडेकर, सौ शिल्पा कुंभार, सौ प्राची आठल्ये, सौ अक्षता कुडाळकर, सौ विशाखा कुलकर्णी, सौ अदिती सावंत, सौ रेखा काणेकर आदी महिला भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा