You are currently viewing बांदा ग्रामस्थांची मंगळवारी दाणोली पदयात्रा..

बांदा ग्रामस्थांची मंगळवारी दाणोली पदयात्रा..

सावंतवाडी

बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाची यावर्षाची दुसरी पदयात्रा मंगळवार दि.28 डिसेंबर रोजी श्री समर्थ सद् गुरु साटम महाराज समाधी मंदिर दाणोली येथे जाणार आहे.

पहाटे बांदा येथे श्री बांदेश्वर भुमिकेला वंदन करुन प्रस्थान होणार आहे. दाणोली येथे पोहोचताच श्री साटम महाराजांना वंदन करुन प्रतिवर्षाप्रमाणे भजन करण्यात येणार आहे. पदयात्री सदस्यांनी अधिक माहितीसाठी अध्यक्ष उमेश मयेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + seven =